करमाळासहकारसाखरउद्योग

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूकीमध्ये 60.79 टक्के मतदान १९ तारखेला मतमोजणी निकाल

करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक मध्ये 60.79 टक्के एकूण मतदान झाले आहे.आदिनाथ कारखान्याच्या साखर पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी मतदान संपन्न झाले आहे. यामध्ये एकूण 72 मतदान केंद्र होते. एकूण मतदार 29041 होते पुरूष 15224 स्त्री 2430 झाले. एकूण 17654 मतदान झाले आहे. एकूण 60.79 टक्के मतदान झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे प्रा. रामदास झोळ सर यांच्या पॅनल मध्ये ही निवडणूक झाली असून शेतकरी सभासद मतदार राजा कोणाला निवडून देणार हे मतपेटीत बंद झाले आहे .एकोणीस तारखेला मतमोजणी होणार असून या निवडणुकीत विजयी पॅनल आदिनाथ साखर कारखान्याचा खरा कारभारी होणार आहे.करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी पोलिस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता . मतमोजणी करण्यासाठी करमाळा, माढा तालुक्यातील पंचायत समितीसह तहसील कार्यालय व कृषी विभागातील कर्मचारी मतमोजणीसाठी करणार असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सौ शिल्पाताई ठोकडे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!