कै डॉ.प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या समाजसेवेचा वसा जपणारे पाटील कुटुंबाचे कार्य प्रेरणादायी-डॉ. श्रीराम परदेशी
करमाळा प्रतिनिधी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन कै डॉ.प्रदीप कुमार जाधव पाटील यांच्या समाजसेवेचा वसा जपणारे पाटील कुटुंबाचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत डॉक्टर श्रीराम परदेशी यांनी व्यक्त केले.कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या शुक्रवार दि. १८ एप्रिल २०२५ रोजी असणाऱ्या जयंतीनिमित्तआई कमला भवानी सामा. बहु. संस्था करमाळा, माईर्स विश्वराज हॉस्पिटल-पुणे, रिदम हार्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-अकलूज, कोकाटे क्लिनिक – बार्शी, ओमेगा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर, बार्शी कॅन्सर केअर-बार्शी, इम्प्लस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर, यांच्या सौजन्याने मोफत सुपर स्पेशालिटी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉक्टर श्रीराम परदेशी म्हणाले की कैलासवासी प्रदीप आबा जाधव पाटील यांच्या वैद्यकीय समाजसेवेचा वारसा त्यांची सुपुत्र डॉक्टर रोहन पाटील अभिजीत पाटील सून डॉ .शिवानी पाटील, अजिंक्य पाटील हे संतोष आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे चालवत असून हीच खऱ्या अर्थाने आबांना आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात 397 रूग्णांनी सहभाग नोंदवला. यावेळी डॉ प्रदिपकुमार (आबा) जाधव- पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालण्यात आला व स्वर्गीय आबांना आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी सर्व मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला . डॉ. रोहन हेगडे MBBS, MD Medicine DBN Cardiologyहृदयरोग तज्ञ रिदम हार्ट ॲान सुपरस्पेशालिटीहॉस्पिटल-अकलूज, डॉ.अशिषबनपूरकरMBBSMD(Paeds)DNB(Paediatric Cardiology)नवजात शिशु हृदयरोग तज्ञ
विश्वराज हॉस्पिटल पुणे,डॉ. अभिजीत कोकाटे
DM (Medical Oncology)कॅन्सर तज्ञ
बार्शी कॅन्सर केअर-बार्शी,डॉ. सनेश गर्दे MBBS DTCDपल्मोनोलॉजी (फुफ्फुसाचे तज्ञ)विश्वराज हॉस्पिटल-पुणे,डॉ. अतुल कोकाटे मानसउपचार व मेंदू विकार तज्ञकोकाटे क्लिनिक-बार्शी,डॉ. रामप्रसाद धरणगुत्ती MBBS D’Ortho अस्थीरोग तज्ञ विश्वराज हॉस्पिटल पुणे,डॉ. शिवाजी साळुंखे
DNB (Surgical Oncology)Cancer Surgeonकॅन्सर सर्जन बार्शी कॅन्सर केअर-बार्शी,डॉ. राहुल जाधव MD(Med) DM(Gastro) (Sion Hospital, Mumbai)पोट विकार तज्ञ ओमेगा सुपरस्पेशालिटी
हॉस्पिटल-अहिल्यानगर,डॉ. दर्शन गौडMBBS,MS (Gen.Surgery) MCH (Neuro Surgery) न्यूरो सर्जनविश्वराज हॉस्पिटल पुणे,डॉ. महेश घुगे DNB Surgeonसर्जन व मुळव्याध तज्ञ इम्प्लस हॉस्पिटल-अहिल्यानगर डॉ.दोशी, डॉ योगेश सातपुते, डॉ रवि डेंगळे हे उपस्थित होते त्याचबरोबर करमाळा असोसिएशनचे सर्व मान्यवर डॉक्टर उपस्थित होते जाधव -पाटील हाॅस्पिटलचा सर्व स्टाफ व मित्रपरिवार यांनी शिबीर उत्तमपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले पुढील काळात देखील अशाप्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात येईल असे डॉ.रोहन पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आभार तात्या जाधव गुरूजी यांनी मानले.


