आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस कोर्सचे 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजन – प्राचार्य बाळासाहेब नरारे सर
करमाळा प्रतिनिधी सुदर्शन क्रिया ही श्री श्री रविशंकर यांनी मानव जीवनाच्या मानवाच्या कल्याणासाठी तयार केलेली श्वसनावर आधारीत असलेले तंत्र असुन मानवाच्या बौध्दिक शाररीक मानसीक अशा सर्वांगीण विकासासाठी आनंदी सुखमय जीवन जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून सुदर्शन क्रिया योग प्राणायाम शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांनी केले आहे. श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून भारतातच नव्हे हा संपुर्ण 180 देशांमध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी सुदर्शन क्रियेचा प्रचार प्रसार केला आहे. शरीर मन भावना यांच्यात समन्वय साधून या तंत्रामुळे ताणतणाव मुक्त जीवन थकवा नाहीसा होऊन राग वैफल्य नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावना या माध्यमातून नष्ट होतात मन शांत एकाग्र होते. सध्याच्या धकाधकीचे जीवनात सुखमय जीवन कसे जगता येईल याची एक कला या माध्यमातून आपणास दिली आहे. त्यामुळे सुदर्शन क्रियाच्या माध्यमातून आपले जीवन सुखी संपन्न करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग सुदर्शन क्रिया योग प्राणायाम शिबिराचा लाभ घ्यावा. हे शिबिर जिल्हा शिक्षक सोसायटी श्रीदेवीचामाळ रोड येथे दिनांक 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. पहाटे पाच ते आठ या कालावधीमध्ये संप्पन होणार आहे. तरी या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी आपण नाव नोंदणी करणे आवश्यक असुन त्यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांनी केले आहे.
संपर्क:
श्री.बाळासाहेब नरारे-9422446841
डॉ. महेश अभंग- 9421062824
डॉ स्वाती घाडगे -844-602-6575
श्री अभयकुमार शहाणे- +91 84460 76535
