फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती दैनिकांच्या समूह राजकीय संपादकपदी राजा माने
मुंबई,दि.७:- ज्या वृत्तपत्र समूहात जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली व्यंगचित्रकार म्हणून आपली कारकीर्द फुलविली त्याच फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती दैनिकांच्या समूह राजकीय संपादकपदी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आज रुजू झाले.
नरिमन पॉइंट येथील कार्यालयात नवशक्तीचे संपादक संजय मलमे व संपादकीय विभागाच्या टीमने अनौपचारिक स्वागत केले.फ्री प्रेस जर्नलचे बालकृष्ण यांनी माने यांना शुभेच्छा दिल्या. नवशक्तीचे कार्यकारी संपादक सावंत यांनी सर्वांचा परिचय करुन दिला.माने यांनी सर्वांचे आभार मानले.
