आळजापूर शाळेचा माझ्या लाडीचं..झाड एक स्तुत्य उपक्रम -गटविकास अधिकारी मनोज राऊत.
आळजापूर प्रतिनिधी
जि.प.प्रा.शाळा आळजापूर यांनी राबविलेला ..माझ्या लाडीचं झाड हा उपक्रम स्तुत्य आहे…असे प्रतिपादन करमाळा पं.स.चे.गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंती निमित्ताने आळजापूर शाळेस दादासाहेब केवारे भाऊसाहेब यांनी ८००० रू.किमतीची झाडे शाळेस त्यांची कन्या भक्ती दादासाहेब केवारे या लाडीच्या नावाने भेट दिली .गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते शाळेत या लाडीच्या झाडाचे व्रक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्धमान ग्रामपंचायत सदस्या सौ.वैशालीताई केवारे ह्या होत्या.राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शाळेतील मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमसाठी शा.व्य.स.चे अध्यक्ष सुरेश गपाट,दत्तात्रय टेंबाळे,शा.व्य.स.चे सदस्य विनोद नवले,दादासाहेब केवारे भाऊसाहेब, बंटी कुंभार,गौतम गायकवाड, माधव रोडे,जयश्री गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या निगुडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक लहू चव्हाण यांनी मानले..
