करमाळा

मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील ‌ यांनी विधानसभा मतदारसंघ आढावा भेटी प्रसंगी प्रा. रामदास झोळ सर यांच्या कार्याचे केले कौतुक

करमाळा प्रतिनिधी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीत प्राध्यापक रामदास झोळ सर सुरुवातीपासून कार्यरत असून मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. करमाळा माढा मतदारसंघातील परिस्थिती विषयी मनोज जरांगे पाटील यांनी प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी सविस्तर ‌ चर्चा केली आहे .मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन मुंबई येथे झालेल्या आंदोलनात ‌ करमाळा समाज बांधवांना जाण्यासाठी 100 गाड्यांना पेट्रोल डिझेल ची सोय करून जेवणाची ही सोय झोळ सर यांनी केली होती. याचबरोबर सोलापूर येथे झालेल्या आंदोलनामध्येही सोलापूर येथे जाण्यासाठी 350 गाड्या ‌ मोफत इंधन देण्याचे काम त्यांनी केले आहे. मराठा समाजाला इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती ‌मिळाव्यात म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या ‌ नेतृत्वाखाली ‌ मुला मुलींचे मोफत शिक्षणाची मागणी ‌ शासनाकडे करण्यात आली यामध्ये मुलींचे पूर्ण शिक्षण मोफत झाले असून ‌ मुलांच्या शिक्षणाबाबत ‌ सवलती संदर्भात पाठपुरावा ‌ ते करीत आहेत. मराठा ओबीसी ‌ बहुजन समाजालाही ‌ इतर समाजाप्रमाणे शैक्षणिक ‌ शिष्यवृत्ती ‌ वस्तीगृह भत्ता मिळण्यासाठी ‌ शासनाकडे त्यांनी मागणी केली होती ती मागणी ही ‌ मान्य करण्यात आली प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी ‌ मराठा समाजाबरोबरच ‌ धनगर ‌ मुस्लिम ‌ बहुजन समाजाला ‌ शैक्षणिक समानतेच्या धोरणावर शासनाकडून सवलत मिळून घेण्याचे काम केले आहे. याचबरोबर ‌ युवकांना ‌ व्यावसायिक शिक्षणाची सोय करून ‌ रोजगार निर्मितीसाठी ‌ नोकरी महोत्सवाच्या आयोजन करून अनेकांना रोजगार मिळवून जिल्हा करमाळा तालुक्यामध्ये रस्ते पाणी वीज याचबरोबर ‌ शिक्षण आरोग्य रोजगार ‌ निर्मितीसाठी ‌ प्राध्यापक रामदास झोळ सर काम करत असून विधानसभेला निवडणुकीसाठी स्वतः उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मराठा बहुजन समाज बांधवांचा त्यांना पाठिंबा ‌ मिळत असून मराठा संघर्ष योध्दा मनोज जरंगे पाटील यांचा वरदहस्त लाभलेला आहे.करमाळा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मराठा समाजाचे योजना दुत सेवकांचे अडीच हजार फॉर्म प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी भरून घेतले आहेत .नारायणगड येथे दसरा मेळाव्याला जाण्यासाठी मराठा समाज बांधवांना प्रवासाची सोय मोफत करण्यासाठी 500 गाड्यांना मोफत इंधन दिले असून या कार्याचे मनोज जरांगे पाटील यांनी प्रा. रामदास झोळसर यांचे विशेष अभिनंदन करून कौतुक केले आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील विविध प्रश्नाविषयी झालेली चर्चा त्यांचे केलेले कौतुक यामधून प्राध्यापक रामदास झोळ सर यांना मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी कौतुक करून आर्शावाद दिला असल्याचे बोलले जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!