राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा
करमाळा प्रतिनिधी
राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय रावगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावगाव केंद्रीय मुख्याध्यापक बहिरू गबाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सरपंच दादासाहेब जाधव व उपसरपंच विष्णू गर्जे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही व्ही कोळेकर, सर्व शिक्षक स्टाप तसेच रावगाव ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य,मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप बरडे, ग्रामविस्तार अधिकारी आर के हजारे, गावकामगार पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, अरोग्य अधिकारी अपेक्षा शिंदे, पवार तसेच अंगणवाडी सेवीका, आशावर्कर,नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले तसेच “हर घर झेंडा” जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले सर्व उपस्थिताचे आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.
