स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ७५ वा अमृत महोत्सव स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ७५ वा अमृत महोत्सव स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे .
यावेळी संस्थेच्या सल्लागार द्रोपदी मारुती वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले होते. प्रथम संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी व पालक यांच्या हस्ते भारत माता,सरस्वती,महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्कूलच्या प्रिन्सिपल धनश्री दळवी यांच्या सुचनेनुसार ध्वजाला झेंडा गीताने सलामी देण्यात अाली या प्रसंगी काही विद्द्यार्थीनींनी, विद्द्यार्थ्यांनी,भारत माता,झाशीची राणी, सावित्रीबाई फुले ,चंद्रशेखर आझाद,भगतसिंग,राजगुरु, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस,बाबासाहेब आंबेडकर,पंडित नेहरू,आदी स्वातंत्र्य विरांची वेशभूषा साकारली होती .विदयार्थ्यांनी आपल्या मनोगताने उपस्थित पालकांची मने जिंकली भारत माता की जय!वंदे मातरमच्या घोषणेने परिसर दुमदुमुन गेला होता.यावेळी स्नेहालय न्यु इंग्लिश स्कुलच्या प्रिंन्सिपल धनश्री दळवी यांनी मार्गदर्शनपर भाषणात स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहून ज्या थोर देशप्रेमींनी देशासाठी बलीदान दिले त्यांच्या बद्दल कृतज्ञता आहे प्रत्येक भारतीयांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून देशाभिमान जपावा असे मत मुख्याध्यापिका धनश्री दळवी व्यक्त केले.यावेळी सहशिक्षिका सीमा कोरडे,शिवांगी शिंदे,हेमा शिंदे,राधा बगडे,पल्लवी माळवे ,फरहान खान,कोमल बत्तीशे,अंजुम कांबळे,सविता पवार, मन्सूर तांबोळी,अंकुश नाळे ,गणेश पवार,राहुल पलंगे अदिंसह पालक कर्मचारी मोठयासंख्येने उपस्थित होते.उपस्थित विदयार्थ्यांना बिस्कीट,चाॅकलेट खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती.
