करमाळा

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराचा वारसा जपल्यास सर्व समाजाचे कल्याण होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुक्याच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना भरत भाऊ आवताडे म्हणाले की राष्ट्रमाता जिजाऊनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. अठरापगड जाती बारा बलुतेदार बहुजन समाजासह सर्व समाजाला एकत्र करून आदर्श राज्य निर्माण केले.
आज राजकारणासाठी भेदाभेद करून खऱ्या अर्थाने समाजामध्ये जातीमध्ये काही समाज विघातक शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजाला खच्चीकरण करुन समाजात असणारी एकता,अ़खंडता,मानवता ,बंधुता प्रेम नष्ट करण्याचे काम ही शक्ती करत आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने आदर्श समाज निर्मितीसाठी लोक कल्याणासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेचे असणाऱ्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याची त्यांनी सांगितले.‍या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी अभिषेक आव्हाड अशपाक जमादार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!