महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब मोरे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब मोरे यांची निवड महाराष्ट्र राज्याचे नेते प्रदेश प्रवक्ते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथे निवड पत्र देऊन केली आहे नानासाहेब मोरे यांनी करमाळा शहर प्रमुख म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेचे काम प्रभावीपणे केले असून विद्यार्थी शेतकरी कामगार महिला सर्वसामान्य नागरिक यांच्यावर होणारे अन्याय विरुद्ध आवाज उठून न्याय मिळवून देण्याचे काम केले असून नागरिकांच्या रस्ते पाणी वीज यासंदर्भात असणाऱ्या समस्यांचे निवारण केले असून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन दिलीप धोत्रे यांनी सोलापूर जिल्ह्यात मनसे मजबूत करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांचे विचार घरा घरात पोहोचण्याचे काम त्यांनी केले आहे महाराष्ट्र सेनेचे राज साहेब ठाकरे प्रदेश प्रवक्ते दिलीप धोत्रे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देणार असु़न सध्या राजकीय परिस्थिती बघता विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला सामील झाले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक या साठ्या-लोट्याच्या राजकारणाला कंटाळला असून सर्वसामान्य जनतेला स्वाभिमानी नेतृत्व असलेले राज साहेब ठाकरे यांचे नेतृत्व प्रभावी वाटत असून येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मनसे नक्कीच सत्ता मिळवणार असून सर्वसामान्य जनता मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावागावात पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.नानासाहेब मोरे यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
