खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील विविध गावात स्ट्रीट लाईट दिव्ये मंजूर – भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा – माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांच्या सन 2021- 22 च्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील जातेगाव, मोरवड, खांबेवाडी, खडकी, कामोने, कुसकरवाडी, आवाटी ,निमगाव ह, नेरले, घारगाव, शेलगाव क, देवीचामाळ ,रायगाव ,लिंबेवाडी, राखवाडी, वाघमारे वस्ती, बिटरगाव श्री ,वंजारवाडी ,पिंपळवाडी ,
हिवरवाडी ,मिरगव्हाण ,करंजे ,पांडे ,
वीट ,रोशेवाडी, देवळाली, खडकेवाडी,हिवरे या गावांमध्ये स्ट्रीट लाईट दिवे मंजूर झाले आहेत अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांना दिली, पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की सन 2019 – 20 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्व खासदार फंड हा आरोग्य विभागात खर्च करण्यात आला होता ,त्यामुळे विकास कामांना खोडा निर्माण झाला ,परंतु येणाऱ्या काळात खासदार
रणजितसिंह नाईक- निंबाळकर व जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात राज्य सरकार व केंद्र सरकार यांचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तालुक्यात विविध विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले,
