केत्तूर येथे झालेल्या वादळी वारे व जोरदार पावसामुळे ऐतिहासिक केत्तूर नं 1 व केत्तूर 2ला जोडणाऱ्या पुलाचे बॅरिकेट्स जोरदार वार्याने पडले
केत्तूर ( अभय माने ) शनिवार (ता.1 ) रोजी दुपारी केत्तूर येथे झालेल्या वादळी वारे व जोरदार पावसामुळे ऐतिहासिक केत्तूर नंबर एक व केत्तूर नंबर दोन ला जोडणाऱ्या पुलाचे बॅरिकेट्स जोरदार वार्याने पडले आहेत ठेकेदाराने काम उरकण्याच्या गडबडीत कमी दर्जाचे काम केल्याने हे बॅरिकेट्स पडले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बॅरिकेटस पडल्याने पुलावरून वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहे. या पुलावरून जड वाहने, शालेय विदयार्थी, शेतकरी , ग्रामस्थ येजा करतात त्यामुळे संबधित ठेकेदार यांनी तातडीने हे काम करून द्यावे तसेच केत्तुर नं-१ ते केत्तुर नं-२ येडे वस्तीजवळ ओढ्याच्या ठिकाणचा रस्ता अतिशय खराब झाला असुन तेथील मुरूम माती वाहुन गेली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. उबाळे यांना संपर्क केला असुन सदरचे काम मार्गी लावणार असलेबाबत त्यांनी सांगितले आहे.. सदरचा असणारा पुल आणि पोमलवाडी ते केत्तुरचा पुल हा केत्तुर , पोमलवाडी च्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन केल्यामुळे राज्यभर गाजला.. शासनाच्या पैशांशिवाय झालेली ही खुप मोठी क्रांती होती, पुढे मागिल युती सरकारचे काळात या पुलांना मंजुरी मिळाली.. पुलाची कामे झाली परंतु ठेकेदाराचे गडबडीच्या कामामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे सदर ठिकाणचे बॅरेकेटस् व्यवस्थित सिमेंट क्रॉक्रीट मधे फीट करावे लागतील.याबाबतीत प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन काम मार्गी लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सुरुवातीला ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सुमारे एक कोटी रुपयांचे काम या पुलाची झाले होते त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सात कोटी रुपये खर्च करून हा पूल पूर्णत्वास नेला आहे.
