करमाळाताज्या घडामोडीराजकीयसकारात्मकसहकार

देशाचे नेते ना. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण येथे रक्तदान शिबिर- चंद्रकांत काका सरडे

करमाळा प्रतिनिधी

कोरोनाच्या पाश्वभुमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे साहेब व आरोग्यमंत्री मा.श्री.राजेश टोपे साहेब यांनी केलेले रक्तदानासंबंधी आवाहन तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री,माजी मुख्यमंत्री,महाविकास आघाडीचे शिल्पकार पद्मविभुषण मा.ना.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.रक्तदान शिबीराचे उद्घघाटन चिखलठाण गावचे सरपंच मा.श्री. चंद्रकांत (काका)सरडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्यांच्यासमवेत आप्पासाहेब सरडे,अमोल मराळ,गणेश कळसाईत,राजेंद्र कांबळे, सुनिल ठोंबरे,अरुण पवार,राहुल कांबळे,अक्षय कांबळे,सुनिल कुचेकर,समाधान कांबळे,तुषार सरडे, अविनाश(सोन्या)कांबळे,संतोष कवितके,सदाशिव लगस,गणेश हरिहर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक सरपंच मा.श्री. चंद्रकांत काका सरडे व तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस करमाळा चि.अनिकेत राखुंडे तसेच समस्थ ग्रामस्थ राष्ट्रवादी प्रेमी चिखलठाण यांनी केले.

camp

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group