Saturday, April 26, 2025
Latest:
करमाळाकृषीसकारात्मक

मा.मंत्री .स्व . दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्ताने 9 मार्च ते 13 मार्च पाच दिवस कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी राज्यातील विविध मान्यवराची उपस्थिती

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे माजी आमदार व माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे कृषी व औद्योगिक महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत हे कृषी प्रदर्शन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगणात होणार आहे त्याची पत्रिका नुकतीच सोशल मीडिया वर बागल गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. ५ दिवसात राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्याबाहेरील मान्यवरांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार नितेश राणे, आ. प्रशांत परिचारक, आ.सचिन कल्याण शेट्टी, आ. रणजित सिंह मोहिते पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंके, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ.प्रणिती शिंदे आदी व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group