शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा यांच्यावतीने जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त कुटीर रुग्णालयात फळे वाटप
करमाळा प्रतिनिधीी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा यांच्यावतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन महेश दादा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील कुटीर रुग्णालय मध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश भैय्या चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे काम जोमाने चालू असून आरोग्य सेवेबाबत जागरूक राहून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधून या सेवा कार्याचा लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांनीी कार्यक्रमप्रसंगी बोलताना व्यक्त केलेे. या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख श्री.अनिल पाटील साहेब, करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्षप्रमुख श्री.शिवकुमार चिवटे, माजी नगरसेवक श्री जयकुमार कांबळे, लिंगायत समाजाचे युवक अध्यक्ष श्री गणेश ममदापुरे, श्री. प्रशांत चिवटे, राशिन पेठ तरुण सेवा मंडळाचे सदस्य श्री गणेश शेठ हलवाई तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री गुंजकर साहेब,भूलतज्ञ डॉक्टर शिंदे साहेब,ढाकणे सिस्टर,हांडे ब्रदर्स, टेक्निशियन रायपूरकर सर,मीना कांबळे, सोनवणे सिस्टर,दलित सेनेचे लक्ष्मण भोसले, खोकर मावशी,गणेश दहिफळे, सिक्युरिटी धेंडे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
