करमाळासकारात्मक

गायरानातील अतिक्रमणे कायम मालकीची करण्याबाबत शासन विचाराधीन- आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी
  संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढुन टाकणे बाबत वरिष्ठ कोर्टाचा निर्णय झालेला होता, त्यानुसार गायरान क्षेत्रातील अतिकमणे निष्काषीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलले होते, परंतु आमचेसह सर्व विद्यमान आमदारांनी याला स्पष्ट विरोध केल्याने, मान. मुख्यमंत्री व मान. उपमुख्यमंत्री यांनी अतिकमाणाचे बाबतीत दिलासा दिलेला असुन.. सदर गायरान क्षेत्रावरील अतिकम णे नियमानुकुल कशी करता येतील, तसेच अतिकृमण धारकांची मालकी हक्कात नावे कशी लागतील या बाबत सकारात्मक चर्चा होवुन सदरची अतिक्रमणे काढण्यास तुर्तात स्थगिती देण्याचे बाबत महाराष्ट शासनाने पाऊले उचलली असुन, वनमंत्री सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांनी या बाबतची माहीती सविस्तरपणे दिली असुन, करमाळा व माढा तालुक्यातील अतिक्रमणाबाबत शासनाचे प्रसिध्द यादीत व प्रत्यक्षात तफावत असुन सदरची तफावत आमदार संजयमामा शिंदे यांनी शासनाचे निदर्शनाला आणुन दिली आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा असुन, यामुळे गोरगरीब, गरजुना एक आधार मिळेल.. असे मत आमदार संजयमामा शिंदे यांनी मांडले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group