Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासहकार

श्री मकाई कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव दिग्विजय बागल यांची भूमिका योग्य रश्मी दिदी बागल

करमाळा प्रतिनिधी श्री मकाई कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव असुन तो डाव हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांची भुमिका योग्य असुन स्व.दिगंबरराव बागल यांच्या रक्तातच स्वाभीमानी असल्याने आम्ही बाहेरच्या लोकांची दादागिरी खपवून घेणार नाही असे मत बागल गटाच्या नेत्या सौ. रश्मी दिदी बागल यांनी व्यक्त केले. श्री मकाई सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्टंटबाजी करत आंदोलन केले.या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व श्री मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली.व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या विरोधात मागील एफ आर पीच्या नावाखाली दादागिरी करून अर्वाच्च भाषा वापरल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय सोनवणे यांना दिग्विजय बागल यांनी कारखान्याबाबतीत जाब विचाराला असता झालेल्या घटनेचा शेतकरी संघटनेने या गोष्टीचा बाऊ करून दिग्विजय बागल यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून मागील एफ आर पी आठ दिवसात जमा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एकंदर सगळी परिस्थिती पाहता करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात असून गाळप करण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा लागली असून जर कारखाना व्यवस्थित चालला तर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप होईल एकतर कोरोनामुळे दोन वर्षांमध्ये शेतकरी देशोधडीला लागला आहे. केवळ राजकारणाचा भाग म्हणून आदिनाथ प्रमाणे मकाई कारखाना बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे बागल गटाच्या स्वाभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा.राजू शेट्टी यांना सांगितले आहे. विरोधकाच्या कटकारस्थानाला व भूलथापांना बळी पडून सर्वसामान्य शेतकरी ऊस तोड कामगार तोडणी वाहतूकदार कारखान्याचे कर्मचारी यांच्या प्रपंचाची होळी करण्याचे महापाप कोणीही करू नये . आम्ही आमची मालमत्ता गहाण ठेवून कारखान्याला आर्थिकसाह्य मिळवून शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला लावले असून करमाळा तालुक्यातील शेतकरी स्वाभिमानी असून मकाई कारखाना सर्वसामान्य शेतकरी यांच्या पाठबळावर उभा असून शेतकऱ्यांचे हित जोपासुन त्यांच्या ऊसाला योग्य दिला आहे.हा कारखाना शेतकरी सभासदांचा असून तो कारखाना यशस्वीपणे गाळप करून तालुक्यात सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group