निंभोरे येथे रविदादा वळेकर यांचे सहकार्यातून नवरात्र उत्सवा निमित्त रुक्मिणी ताई पठाडे यांचा भव्य कीर्तन सोहळा
निंभोरे प्रतिनिधी
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. करमाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा निमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळा मार्फत केले जाते.
त्याच पद्धतीने निंभोरे येथे देखील नवरात्र उत्सवा निमित्त जय भवानी सार्वजनिक मित्र मंडळ, निंभोरे हे गावातील एकच मंडळ गावातील तरुण वर्ग एकत्र येऊन स्थापन केले आहे. ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक गाव एकच देवी मातेची स्थापना केली जाते.निंभोरे गावात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे.
कोरोणा महामारी नंतर यावर्षी मोठ्या उत्साहाने मंडळाने देवीची प्रतिष्ठापना केली आहे. तेव्हा गावातील लोकं मोठ्या उत्साहाने सकाळी व संध्याकाळी आरतीच्या वेळी देवीसमोर दर्शनासाठी जमतात.यावेळी भक्त जणांना महा प्रसादाचे वाटप गावचे उपसरपंच जोतीराम(तात्या) वळेकर व रविदादा वळेकर यांचे कडून करण्यात आले.
नवरात्र उत्सव साजरा करत असताना काही तरी इतर कार्यक्रम घेण्यापेक्षा लोकांना मार्गदर्शन पर कीर्तन सोहळा आयोजित करायचा असे निंभोरे गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.रविदादा वळेकर व मंडळाचे पदाधिकारी यांनी ठरविले. तेव्हा ह.भ.प. रुक्मिणी महाराज पठाडे (कर्जत) यांचा भक्ती पर कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी त्यांचे समवेत दीपाली ताई खिळे,दत्ता महाराज खामकर, रामचंद्र मामा खिळे,रणजित देवकर उपस्थित होते.तसेच गावातील भजनी मंडळी यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी रुक्मिणीताई महाराज पठाडे यांचा सन्मान सौ.महानंदा अंकुश वळेकर यांचे कडून हार,श्रीफळ,शाल देऊन करण्यात आला व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सन्मान हार, श्रीफळ,शाल देऊन मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व रविदादा वळेकर आणि आर.व्हि.ग्रुप चे पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन मा.श्री.रविदादा वळेकर यांनी केले होते. यावेळी जयभवानी सार्वजनिक मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर.व्हि. ग्रुप चे पदाधिकारी तसेच जय भवानी सार्वजनिक मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी नियोजन केले.
