करमाळा तालुक्यात तीन आठवड्यापासून पावसाळा ब्रेक बळीराजाला पावसाची ओढ
केत्तूर ( अभय माने ) करमाळा तालुक्यात गेल्या तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाला आहे. तालुक्यामध्ये एक-दोन मोठे पाऊस वगळता मोठा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पाझर तलावात म्हणावा तेवढा पाणीसाठा झाला नाही.उजनी लाभक्षेत्रात व परिसरात पाऊस न पडताही पुणे जिल्हा व परिसरात पडलेल्या पावसाच्या जीवावर उजनी धरणात 100 % चे वर पाणीसाठा झाल्याने ही आनंदाची व समाधानाची बाब आहे.
पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे तालुक्याच्या काही भागात ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस होत असला तरी तो ही पाऊस फायदेशीर नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे यापुढे समाधानकारक पाऊस न झाल्यास याचा फटका पुन्हा उन्हाळ्यात बसणार आहे..
