Wednesday, April 23, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

शेटफळ येथे ‘श्रावण महोत्सवाच्या कार्यक्रमातुन समाज प्रबोधन व जिवंत नागराजाच्या दर्शनाचा आनंदोत्सव

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेटफळ येथे श्रावण सप्ताहाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत भारुडकरांनी विविध विषयावर प्रबोधन करून आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामदैवत नागराजाचे प्रत्यक्ष दर्शनाने भाविकांचा उत्साह आणखी वाढला आहे.आज सकाळी नागनाथ मंदिरातून काळ मृदंगाच्या जयघोषात देवाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती समोर वारकरी ज्ञानदेव तुकाराम नामघोष करत ठेका धरत होते कार्यक्रमाला परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शेटफळ तालुका करमाळा येथील नागनाथ देवाच्या श्रावण उत्सवाला सुरुवात होते पंचमी दिवशी पारंपरिक पद्धतीने जिवंत नागाची पूजा करून पंचमी साजरी केली जाते , श्रावणी अष्टमीला या उत्सवाची सांगता होते.
यावेळी भारूडाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी शुक्रवारी ता 5 ऑगस्ट रोजी झालेल्या भारुडाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील नामवंत भारुडकरांनी हजेरी लावून आपली कला सादर केली.या कार्यक्रमाच्या वेळी या गावचे ग्रामदैवत नागराज याचे दर्शन उपस्थितांना होते. या गावांमध्ये नागोबाला मारले जात नाही, त्यांची पूजा केली जाते या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित लोकांनी जिवंत नागाचे दर्शन घेऊन हा उत्सव साजरा केला या कार्यक्रमाला या परिसरातील महिला व पुरुष भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group