गुरूवर्य सुखदेव साखरे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन.
करमाळा प्रतिनिधी श्री राजेश्वर विद्यालय राजुरीचे माजी मुख्याध्यापक, एक आदर्श, ध्येयवादी, पिढ्या घडवणारे शिक्षक, गुरूवर्य सुखदेव साखरे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन.झाले. राहत्या गावी 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजुरी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्कयसंस्कार करण्यात आले.
D.S साखरे सरांचे ते वडील होते,त्यांच्या मागे ३ मुली, पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत मनमिळावू प्रेमळ स्वभावाचे म्हणून सुखदेव साखरे सर्वांना परिचित होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य संस्कार केल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये त्यांनी आदर्श स्थान प्राप्त केले होते. त्यांच्या आकस्मिक निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
.
