Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

आष्टीचा नवरदेव करमाळयाची नवरी साखरपुड्याला आले अन विवाह करून गेले या विवाहाचे सर्वत्र कौतुक

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील संतोष मारुती यादव यांची मुलगी सिद्धी हिचा साखरपुड्यामध्ये अचानक लग्न सोहळा आंनदात पार पडला.मुलाकडील मंडळी सुपारी आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते लग्न करून मुलीला घेऊन गेले संतोष यादव यांच्या मुलीचे लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलाशी करायचे ठरले होते लग्नाची बोलणी करुन साखरपुडा करण्यासाठी आले होते. पंढरपूर जवळ आष्टी गाव येथील नवरदेव असुन सुपारी फोडून लग्नाचे बोलणी करून साखरपुडा करणार होते.पण अचानक विचार बदलला व लग्न करून नवरीला घेऊन गेले. 10.30/ ला नवरा मुलाकडचे आले 11.30/ ला सुपारी फुटली 12.30 ला साखरपुडा झाला आणि अचानक लग्न करण्याचा निर्णय झाला विवाह सोहळा संप्पन झाला.या विवाह सोहळयाला विजय लावंड, दिनेश राठोड, सचिन गायकवाड, डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील जाधव, डाॅ.रोहन जाधव पाटील, उमेश निंबाळकर, ज्योतीराम लावंड, समस्त लावंड परिवार व समस्त यादव परिवार आणि इतर नातेवाईक उपस्थित होते सर्वांनी वधू वरास भरभरून आशीर्वाद दिले. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विवाह केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group