पुरातन खोलेश्वर महादेव मंदिराला नारायण मोटे सर यांच्यातर्फे श्री खोलेश्वर महादेव मंदिराला आरती ढोल मशीन सप्रेम भेट
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील किल्ला विभागातील राजेरांवरंभाकाळातील जागृत पुरातन खोलेश्वर महादेव मंदिराला नारायण (देवा) सर मोटे यांच्यातर्फे श्री खोलेश्वर महादेव मंदिरासाठी आरती ढोल मशीन सप्रेम भेट दिली श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारची महाआरती मोटे कुटुंबाच्या हस्ते करण्यात आली मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या ठिकाणी त्यांची सर्व कुटुंब व आरती मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. नागेश गुरव (पुजारी), संजय भालेराव, सुनील विभुते, चंद्रशेखर राजमाने, रोहित काळे, दिग्विजय घोलप, रूपेश पाटील, राजेंद्र माहुले, आदी उपस्थित होते.
