करमाळाकृषीसकारात्मक

खडकी ग्रामपंचायतीचा वृक्षसर्वंधनाचा उपक्रम प्रेरणादायी तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीने आदर्श घेऊन वाटचाल करावी -दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी खडकी ग्रामपंचायतीचा वृक्षसवर्धंनाचा उपक्रम प्रेरणादायी असुन करमाळा तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनी याचा आदर्श घेऊन करमाळा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी कार्यतत्पर व्हावे असे मत मकाईचे चेअरमन युवा नेते दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत तर्फे तालुक्याला अभिमान वाटावा असा उपक्रम सध्या राबवण्यात आला आहे.                                                                   या ग्रामपंचायतीतर्फे सुमारे १५,००० वृक्षांची लागवड गावातील परिसरात करण्यात आली असुन यानिमित्ता तेथे भेट देऊन ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले. तसेच या स्तुत्य कार्यात योगदान देणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना, वृक्षप्रेमींना, व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.या वृक्षांची लागवड पूर्णतः ग्रामस्थ खडकी यांच्यातर्फे करण्यात आली असून यांचे उत्तम संगोपन सुद्धा करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचतींनी अश्या प्रकारचे उपक्रम राबवून तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यात योगदान दिले पाहिजे.
पंधरा वित्त आयोगातर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन बस थांब्याचा भूमिपूजन सोहळा सुद्धा यावेळी संपन्न झाला.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, वृक्षप्रेमी, माझे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group