महाविकास आघाडीचे उमेदवार मा .आ.नारायण आबा पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नामदार शरदचंद्रजी पवार यांची 17 नोव्हेंबरला करमाळयात जाहीर सभा
करमाळा प्रतिनिधी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा नामदार शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालय प्रांगणामध्ये रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती सोशल मीडिया द्वारे घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस पक्षाची चांगली साथ लाभली असून तिन्ही घटक पक्ष सक्रियपणे नारायण आबा पाटील यांचा प्रचार करीत आहेत. ऐन विधानसभेला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नारायण आबा पाटील यांना पाठींबा दिला असून सत्ताकारण्यातील महत्त्वाचा गट असलेल्या सावंत गटाने ही नारायण आबा पाटील गटाला पाठिंबा दिलेल्या असल्यामुळे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे पारडे जड होत चालले असून. नामदार शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा करमाळा शहरात महात्मा गांधी विद्यालय प्रांगणात करमाळा येथे ही सभा संपन्न होणार आहे . या सभेला शेतकरी युवक महिला नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.
