आदिनाथ साखर कारखाना गाळपासाठी सज्ज कारखान्यावर वाहनांची गर्दी
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना गाळपा साठी सज्ज झाला असून गेल्या तीन ते चार वर्षापासून आदिनाथ कारखाना चालू होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला यानंतर प्रयत्नाला यश मिळाले असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मा.आमदार नारायण आबा पाटील बागल गटाच्या नेत्या सौ. रश्मी दिदी बागल चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे नितीन जगदाळे डाॅ.हरिदास केवारे व सर्व संचालक मंडळ बचाव समितीचे हरीदास डांगे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ डाॅ.वसंत पुंडे दत्ता जाधव महेश चिवटे यांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळे कारखाना चालू झाला आहे. आदिनाथचा धुराडा दिमाखात पेटला आहे.आदिनाथ हा शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना असुन सभासदाचा विश्वास या कारखान्यावर असल्यामुळे आदिनाथ साखर कारखान्यावर ऊस गाळपसाठी वाहनांची गर्दी होत आहे हे आदिनाथ वर असलेल्या विश्वासाचे प्रतीक असून शेतकरी सभासद कामगार संचालक मंडळाच्या पाठबळावर आदिनाथ कारखाना पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी सिध्द झाला असून आदिनाथ यशस्वीपणे गाळप करणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
