Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

भोसेत अडसूळ यांनी मुलीच्या वाढदिवशी प्राथमिक शाळेस दिले ५० हजाराचे साहित्य

करमाळा प्रतिनिधी–करमाळा तालुक्यातील भोसे येथील औषधविक्रेते जयसिंह अडसूळ यांनी मुलगी राजनंदिनी हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ५० हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य भेट दिले आहे. राजनंदिनी ही भोसेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाहिली इयत्तेत शिकत आहे. चौदा डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस असताना अडसूळ परिवाराने अनावश्यक खर्च टाळून शाळेसाठी साहित्य देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने संगणक संच, मास्क, सँनिटायझर अशा ५० हजार रुपये किंमतींच्या वस्तू शाळेस भेट दिल्या. याशिवाय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर निमित्ताने आयोजित कार्यक्रमावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुनील अडसूळ, शिवशंभो ट्रस्टचे संजय सरडे, नवनाथ बागडे, दौलत रोडगे, अशोक अडसूळ, संतोष अडसूळ, जनार्धन बागडे, दत्तू पवार, बापू पवार आदि उपस्थित होते.
यावेळी करे-पाटील यांनी अडसूळ यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर डॉ. अडसूळ यांनी जयसिंह अडसूळ हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासतात. यापुढेही शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य राहील, असे स्पष्ट केले. याप्रसंगी शाळेच्या वतीने अडसूळ यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले. तर आभार शिक्षक उमराव वीर यांनी मानले.यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे – पाटील यांनी भोसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. याशिवाय शाळेच्या ई – लर्निंग उपक्रमांसाठी यशकल्याणी संस्थेच्या वतीने स्मार्ट टी. व्ही. भेट देण्यात येईल. असे घोषित केले. जयसिंह अडसूळ यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी संगणक व इतर साहित्य देण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी कौतुक केले. शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असून अडसूळ यांचा आदर्श इतरांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group