सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांचे नातु चि. खुश संकेत खाटेर याच्या वाढदिवसानिमित्त शिखर शिंगणापूर गोंदवले यात्रेचे प्रस्थान
करमाळा प्रतिनिधी खुश संकेत खाटेर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले दर्शन यात्रेचे पौर्णिमेच्या दिवशी आयोजन करणेत आले असून ह. भ. प. ऍड बाबुराव हिरडे तसेच जगताप गटाचे युवा नेते शंभूदादा जगताप, विजयसिंह परदेशी, यांच्या हस्ते गाडीची पूजा करून यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ऍड हिरडे यांनी खाटेर यांचे आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. युवा नेते शंभूदादा जगताप यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की देवदर्शन यात्रा करणे पुण्याचे काम आहे पण यात्रा घडवून आणणे हें भाग्यवंताचे काम असून ते काम सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर करत असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच यात्रेला जाणाऱ्या भाविकांना पण आज च्या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.या यात्रेसाठी 45 भाविक सकाळी सहा वाजता रवाना झाले
यावेळेस भाजपाचे नेते विठ्ठलराव भणगे, शिवसेना नेते संजय शिंदे,माजी नगरसेवक नारायण तात्या पवार,अरुणकाका जगताप, अनंता मसलेकर,नितीन दोषी चरनसिह परदेशीं,संतोष गानबोटे, शंकर रासकर, नितीन दोशी, सुरेश चव्हाण, पप्पू अनारसे, चंद्रकांत काळदाते, प्रीतम शियाळ,वर्धमान खाटेर, विजय बारीदे, पृथ्वीराज केंगार अमित लुंकडं,प्रवीण मंडलेचा बाळासाहेब नाळे,नगरसेविका संगीता खाटेर मनीषा मसलेकर, मंदाकिनी पवार, पुष्पा लुंकडं,माधवी दोशी सीमा देवी, यांचेसह अनेक पुरुष, महिला भाविक उपस्थित होते वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.
