भाजपविरोधी प्रखर भूमिका मांडणारे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपचे कटकारस्थान-धवलसिंह मोहिते पाटील करमाळ्यात धरणे आंदोलन संपन्न
करमाळा प्रतिनिधी हिंदुत्वाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटून अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची पिळवणूक करणारे भाजप सरकार असून भाजप सरकार विरोधी भूमिका मांडणारे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारने केला असल्याचे मत अखिल भारतीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. करमाळा येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन दिनांक 15 ते 20 एप्रिल या कालावधीत सपुंर्ण जिल्हयात सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे . करमाळ्यामध्ये १८ एप्रिल रोजी तहसील कार्यालय करमाळा येथे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने सत्याग्रह धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी पुढे बोलताना धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की मोदी सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या सरकार विरोधात आवाज उठून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचार वाढती महागाई यावर मोदी सरकारला जाब विचारला सर्वसामान्य जनतेला सरकारच्या भानगडी माहित पडतील आपले सरकार जाईल या भीतीने केवळ आवाज दाबण्यासाठी षडयंत्र रुतून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे काम या सरकारने केले आहे जोपर्यंत राहुल गांधी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करतच राहणार सत्य परेशान है लेकिन पराजित नाही सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस कटिबद्ध असून जनतेला न्याय देण्यासाठी काँग्रेस कार्यरत राहणार असल्याची जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. करमाळ्याचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांचे संघटन व कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विजय हत्तुरे प्रतापराव जगताप प्रवीण कटरिया समाधान फरतडे तेजस ढेरे संतोष वारे .अभिषेक आव्हाड हरिभाऊ मंगवडे राजकुमार देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन करमाळ्याचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना देण्यात आले.या सत्याग्रह आंदोलनास महाविकास आघाडी मधील मित्रपक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर लावंड शहर प्रमुख प्रवीण कटरिया विधानसभा संघटक संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यावेळी राधाकृष्ण पाटील दस्तगीर पठाण संजय शिंदे संतोष गानबोटे काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप अभिजीत भालेराव समीर हलवाई सचिन काळे महमंद हाफिज कुरेशी ओबीसी काँग्रेस तालुका अध्यक्ष गफुरभाई शेख तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ कुमार माने राजकुमार देशमुख जैनुद्दीन शेख नितीन चोपडे गणेश फलफले, बबलू चिंचकर जावेद मुलानी सुलतान शेख संभाजी शिंदे अशोक घरबुडे ,धर्मराज शिंदे रमजान भाई शेख,दादा कुदळे धर्मराज शिंदे आधी जण उपस्थित होते.