Saturday, April 26, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र करमाळा येथे स्वामी जयंती उत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊलीं यांच्या शुभ आशिर्वादाने श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र खोलेश्वर मंदिर करमाळा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.०० वाजता भूपाळी आरतीने सुरूवात झाली. नंतर सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरती संपन्न झाली. आरती झाल्यानंतर सामुदायिक श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पठण सेवा घेण्यात आली. स्वामी जयंती चे औचित्य साधून १३६ महिला, पुरुष व बाल सेवेकरी यांनी या सेवेमध्ये सहभाग घेतला. सामुदायिक पठण नंतर मांदियाळी करण्यात आली. सेवेकरी यांनी प्रत्येकाच्या घरून आणलेला नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवला व नंतर मांदियाळी करण्यात आली. सायंकाळी ६.०० वाजता महानैवेद्य आरती व मार्गदर्शन सेवा श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुज्य गुरूमाऊली यांच्या चरणी अर्पण केली. जास्तीत जास्त सेवेकरी घडावे व ग्राम अभियान अंतर्गत गाव तेथे केंद्र व घर तेथे सेवेकरी घडवण्यासाठी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. जास्तीत जास्त सेवेकरी आरती साठी उपस्थित राहिले होते. करमाळा तालुक्यातील चिखलठाण, वीट, भोसे, रावगाव सेवा केंद्र येथे मोठ्या उत्साहात स्वामी जयंती उत्सव साजरा करण्यात आला.सर्व सेवेकरी यांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group