न्यु स्नेहालय इंग्लिश स्कूलच्यावतीने कोरोनात निराधार झालेल्या पाल्यास दत्तक घेणार-जयंत दळवी
करमाळा प्रतिनिधी
कोरोना आजाराने ज्या पाल्याचे आई वडील किंवा दोघांपैकी एकाचे निधन झालेले असल्यास त्या कुटूंबातील एका पाल्यास श्री रामचंद्र ब.सा.से.संस्था संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दत्तक घेण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांनी दिली आहे.
यामध्ये पाल्याचा पूर्ण शैक्षणिक फी,गणवेश, व विशेषत :चालू शैक्षणिक सञ आहे तोपर्यंत त्याची आरोग्य संवर्धन संस्थेमार्फत करण्यात येणार आहे यामध्ये पहिली ते पाचवी या विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी संबंधित नातेवाईक यांनी स्कूलमध्ये येऊन शाळेच्या वेळेत शिक्षकांची भेट घ्यावी असे आवाहन अध्यक्ष जयंत दळवी यांनी केले आहे. यावेळी मुख्याध्यापिका धनश्री दळवी,सह शिक्षिका सीमा कोरडे,हेमा शिंदे,पल्लवी माळवे,सुपर्णा बाबर,शिवांगी शिंदे,राधा बागडे,कोमल बत्तीसे,रूपाली महाडिक,मन्सुर तांबोळी,दत्ता माने,आदी कर्मचारी उपस्थित होते .
