राजुरीत ग्रामपंचायतीच्यावतीने लम्पी आजारावरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण उद्यापासून सुरू होणार- डाॅ.अमोल दुंरदे
राजुरी प्रतिनिधी राजुरीत ग्रामपंचायतीच्यावतीने लम्पी आजारावरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण उद्यापासून सुरू होणार. आहे अशी माहिती राजुरीचे सरपंच डाॅ.अमोल दुंरदे यांनी दिली आहे.
उद्या सकाळी 8 वाजता राजुरी मध्ये मा.डॉ.प्रवीण शिंदे, पशुधन विकास अधिकारी( विस्तार ), पंचायत समिती,करमाळा यांच्या शुभहस्ते लसीकरण सुरवात होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्व जनावरांना डॉ. झोळ व त्यांच्या टीम कडून लस टोचवून घ्यावी. शेतकऱ्यांनी लंपी आजाराला घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय योजना कडे लक्ष द्यावे. शक्यतो जनावरांना गावाच्या बाहेर घेऊन जाऊ नये. लम्पिची कोणतीही लक्षणे आढळल्यास ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय अधिकार्यास संपर्क साधावा.
अशी माहिती लोकनियुक्त सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली आहे.
