महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य उद्योग प्रदर्शन आयोजन-निखिल चांदगुडे
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य उद्योग प्रदर्शन आयोजन केले आहे अशी माहिती युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी दिली आहे.
या प्रदर्शनाचे आयोजन सलग तीन दिवस असून प्रदर्शनातील स्टॉल बुकिंग ची सुरुवात झालेली आहे. स्टॉलची अरेंजमेंट-टेबल व खुर्ची व्यवस्थित विभागणी व्यवस्थापनाकडून केली जाईल. या कार्यक्रमामध्ये खास महिलांसाठी करमाळ्यातील नामांकित डेव्हलपर्स तर्फे प्लॉट खरेदी व घर खरेदी वर आकर्षक सूट व गिफ्ट मिळणार आहे. सरकार तर्फे महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती देणे व वाटप होणार आहे. कार्यक्रमाचा व्यवस्थापन व स्टॉल बुकिंग साठी करमाळा तालुका शिवसेना-युवसेना, सहकार सेना व महिला आघाडी संपर्क साधावा व ८५३००८८७६३, ८८८८२१९९०४हे प्रदर्शन रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत १० व ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ५:०० ते ९:३० वाजेपर्यंत छोटू महाराज सिनेमा थेटर, बायपास रोड, करमाळा येथे होणार आहे.
