करमाळा

दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज केतुर नं १ मध्ये आषाढी एकादशीनिमित्त आनंदवारी

केतुर प्रतिनिधी दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यू. कॉलेज केतूर नं १ मध्ये बुधवारी आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या प्रांगणा मध्ये आनंदवारी चे आयोजन करण्यात आले होते.वारकरी पोशाख, अधूनमधून पडणारा पाऊस, टाळ मृदंगाच्या आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी केतुर गावातून फेरी काढण्यात आली व शाळेच्या मैदानात गोल रिंगण करून त्यामध्ये पारंपरिक भजन, फुगडी, भारुड असे खेळ घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शाळेचे प्राचार्य श्री मारकड सर यांच्या हस्ते आरती घेण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रम संप्पन झाला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!