वाशिंबे येथील नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने लम्पी आजारावरील प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार.
वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे येथील नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने लम्पी आजारावरील प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार.
वाशिंबे येथील नवयुग कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ व वाशिंबे ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ झोळ यांच्या संयुक्त विद्यमाने लम्पी आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे मार्गदर्शक गणेश भाऊ झोळ यांनी दिली आहे.
तरी वाशिंबे गावातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्व जनावरांना डॉ. मंगेश झोळ व त्यांच्या टीम कडून लस टोचवून घ्यावी. शेतकऱ्यांनी लंपी आजाराला घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय योजना कडे लक्ष द्यावे. शक्यतो जनावरांना गावाच्या बाहेर घेऊन जाऊ नये.लम्पिची कोणतीही लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकार्यास संपर्क साधावा.
असे आवाहन मंडळाचे मार्गदर्शक गणेश झोळ.अध्यक्ष आशरफ शेख, उपाध्यक्ष दिग्विजय पवार यांनी दिली आहे.
