जनावरांच्या लंप्पी आजारामुळे पशुसंवर्धन डाॅक्टर्स ने हेडक्वाॅटरला रहावे.हलगर्जी खपवून घेणार नाही – संजय (बापु) घोलप
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जवळपासच्या तालुक्यात जनावरांवर लंप्पी आजाराची लागण झालेली असुन करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आहे कि जरं आपल्या तालुक्यातील जर लागण झाली तरं जो शेतकरीवर्ग जनावरांच्या दुधावर आपले घर प्रपंच चालवतो मुलांचे शिक्षण असेल दवाखाना असेल ईतर किरकोळ खर्च दुधावर निघुन जातो. ह्या रोगाची लागण जर तालुक्यातील जनावरांना होऊन दगावले तरं प्रपंच कसा चालवायचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होऊन शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष मा.संजय (बापु) घोलप यांनी सर्व संबधीत अधिकाऱ्यांना पत्राद्वारे लंप्पी आजारावंर उपाय योजना करावी अशी मागणी केलेली आहे
अशातच करमाळा तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी ,डाॅक्टर्स यांनी त्या संदर्भात पुर्ण लक्ष देऊन हेडक्वाॅटरला राहण्याची वेळीच किरकोळ जरी आजार जनावरांना झाला तरी त्वरीत दखल घेऊन ती लंप्पी ची लक्षणे आहेत का नाही याची शहानिशा करण्याची व शेतकरीवर्ग ना आधार देण्याची खरी गरज आज आली आहे व त्यांनी हेडक्वाॅटरला रहावे बरसचे डाॅक्टर्स हे हेडक्वाॅटरवर राहत नसल्याचे अगोदर दिसुन येत होते कमीत कमी संकटाच्या वेळेस तरी प्रामाणीक नोकरी करावी व वरिष्ठ अधिकारांनी लक्ष द्यावे..अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळा शेतकरीवर्गाला वाऱ्यावर सोडणार नाही असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी सांगितले आहे.