मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्या महाराष्ट्र बंद सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने उद्या करमाळा बंदचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे शासनाकडून काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या मागणीला समर्थनार्थ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्या 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या मागणीला सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला असून याबाबत त्यांनी निवेदन दिले असून करमाळा शहर व तालुक्यामध्ये शांततेत बंद पाळण्यात येणार आहे . करमाळा शहर व तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊन बंद पाळावा असे आवाहन सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
