जगद्गुगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिर ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा
करमाळा प्रतिनिधी अनंत घोषित जगद्गुगुरु रामानंद आचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने 14 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेमध्ये भव्य महारक्तदान होणार आहे. या रक्तदान शिबिरात करमाळा शहर व तालुक्यातील सर्व साधक शिष्य महिला भगिनीं सर्व भाविक भक्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून या पुण्याच्या कार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.करमाळा तालुक्यात अपघात मोठ्या प्रमाणात होत असुन नागरिकांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी ॲब्लुलन्स अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा गोविंद कर्मयोगी गोविंद बापू पाटील सभागृह बाजार तळ जेऊर येथे होणार असून या कार्यक्रमास सर्व शिष्य साधक भक्त नागरिकांनी संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.
