विकास कामाच्या बाबतीत सतत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे – पृथ्वीराज पाटील
करमाळा प्रतिनिधी विकास कामाच्या बाबतीत सतत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजाभाऊ आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने त्यांचा मित्रपरिवार मोठया प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहे यावरूनच त्यांचं काम लक्षात येत असे मत युुवक नेते पृथ्वीराज भैय्या पाटील यांनी व्यक्त केले ते राजुरी येथे युवा नेतृत्व राजेंद्र भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरी येेथे बोलत होते . त्यांच्या अंगी विचार व विकासाचे धोरण असल्यामुळे तालुक्याचे नेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाची साथ त्यांच्या पाठीशी आहेच व यापुढेही आम्ही सारे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली राजुरीच्या विकासाबाबत आबा नेहमीच सकारात्मक असतात व यासाठी गावकऱ्यांचाही वेळोवेळी सहकार्य लाभत आहे
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा केक कापून व शाल, श्रीफळ, फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे ,पत्रकारा अण्णासाहेब काळे ,विहाळ चे सरपंच प्रतिनिधी संजय चोपडे,
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किसन कांबळे ,संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर ,किरण जाधव, एकनाथ शिंदे ,बंडू गुरुजी, बंडू शिंदे, आबासाहेब टापरे ,शिवाजी जाधव, बंडू टापरे ,शुभम कुलकर्णी, भाऊसाहेब जाधव ,कल्याण दुरंदे, हनुमंत जगताप ,मेजर धनंजय जाधव, उपसरपंच राहुल पाटील ,डॉक्टर पापा मनेरी ,गौतम गरुड, संदीप शिंदे, शाहरुख शेख, दत्ता दुरंदे ,बापू दरंदे, गणेश जाधव, पप्पू टापरे ,नागेश मोरे, माऊली चिंचकर ,आप्पा निरगुडे, नवनाथ दुरंदे ,चैतन दुरंदे ,सोनू फरांडे, गणेश टापरे, तुषार टापरे ,नामदेव टापरे ,गणेश घोरपडे ,मयूर सराटे, माऊली पुणेकर, बाळू साखरे, प्रतीक वाबळे ,सोमनाथ शिंदे ,रेवननाथ बोबडे,
नवनाथ हुंबे ,दादा तांबे मांजरगाव,श्रीकांत साखरे, योगेश जाधव ,अजय साखरे ,सुनील काका कुलकर्णी आदी उपस्थित होते.
