ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती त्यानिमित्त ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या उपस्थित मध्ये आनंदात साजरी करण्यात आली यावेळी वेगवेगळ्या मुलींनी सावित्रीबाई व महात्मा फुले यांची वेशभूषा करून सर्वांना आकर्षित केले त्यामधूनच ज्ञान प्रबोधन केले यामध्ये धनश्री जगताप, ईशा दाभाडे ,अनुष्का राठोड, श्रुतिका सुरवसे , दीप्ती गुळवे,तनया लबडे,स्नेहल धोंडवड, ज्ञानेश्वरी मोरे, टीशा राठोड, या सर्वांनी सावित्रीमाई ची प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच काही विद्यार्थ्यांनी भाषणे करून सावित्री माई चा कार्याचा गौरव केला.तसेच शिक्षणमधून प्रा.शीतल किर्ते मॅडम व विवेक कांबळे सर यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना सावित्री माई ची कार्याची छान ओळख करून दिली.त्याच बरोबर इन्स्टिट्यूट चे संस्थापक महेश निकत सर यांनी ही सावित्री माई नी केलेल्या कष्टाची ओळख करून दिली.यावेळी संचालिका अश्विनी निकत मॅडम ,प्रा.दहीटनकर सर , प्रा. सुतार सर , प्राध्यापिका बनसोडे मॅडम उपस्थित होते.
