करमाळा

जलसंधारण विभागाच्या मंजूर 40 कोटी 34 लाख कामावरची स्थगीती उठवली-आमदार संजयमामा शिंदे 


करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या करमाळा माढा मतदारसंघातील 40 कोटी 34 लाख 33 हजार 578 रुपये निधी मंजूर असलेल्या 15 कामांच्या निविदेवरती शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिलेली होती .सदर स्थगिती उठविणे संदर्भात चा निर्णय 4 ऑगस्ट 2023 रोजी झालेला असून सदर कामे पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
जलसंधारण महामंडळाकडून मंजूर असलेल्या पुढील कामांची स्थगिती उठलेली आहे. वडाचीवाडी येथील रूपांतरित साठवण तलाव – 4 कोटी 28 लाख 46 हजार 18 रुपये, अर्जुननगर येथील भोगेशेत गेटेड चेक डॅम – 78 लाख 62 हजार 524 रुपये ,गेटेड चेक डॅम पोथरे क्र. 1 – 98 लाख 8 हजार 23, गेटेड चेक डॅम पोथरे क्र.2 -1 कोटी 52 हजार 433, गेटेड चेक डॅम पोथरे क्र.3 1 कोटी 11 लाख 747 , गेटेड चेक डॅम पोथरे क्र.4 – 35 लाख 74 हजार 935 , कोर्टी धुमाळ वस्ती येथील गेटेड चेक डॅम – 61 लाख 36 हजार 416,
भोसरे चव्हाण वस्ती येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा 1 कोटी 60 लाख 11 हजार 410, लव्हे येथील रूपांतरित साठवण तलाव – 7 कोटी 97 लाख 65 हजार 341, केडगाव येथील रूपांतरित साठवण तलाव -5 कोटी 44 लाख 13 हजार 388, घारगाव येथील रूपांतरित साठवण तलाव – 4 कोटी 92 लाख 68 हजार 524 ,भोसे येथील रूपांतरित साठवण तलाव – 6 कोटी 3 हजार 350 , कोर्टी येथील पाझर तलावासाठी 1कोटी 56 लाख 64 हजार 441 रुपये, जातेगाव येथील पाझर तलाव – 2 कोटी 19 लाख 10 हजार 726, आवाटी येथील पाझर तलाव पुनर्बांधणी1 कोटी 60 लाख 25 हजार 02 असा एकूण 12 गावातील 15 कामांसाठी 40 कोटी 34 लाख 33 हजार 578 रुपये निधी मंजुरीवरील स्थगिती उठल्यामुळे लवकरच ही कामे पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group