Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

बदलापूर तसेच कलकत्ता घटनेचा सोलापूर जिल्हा काँग्रेस इंटक ने केला तीव्र शब्दात निषेध

करमाळा प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तसेच कलकत्ता येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा आज सोलापूर जिल्हा काँग्रेस इंटक यांनी तीव्र शब्दात निषेध केला सदरचा निषेध सोलापूर जिल्हा काँग्रेस इंटक चे जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव यांनी तीव्र शब्दात सदर घटनेचा एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे निषेध व्यक्त केला आहे.श्री जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात असे म्हटले आहे की सदरची दोन्ही घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून सदर घटनेतील आरोपीला शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी फक्त तात्पुरते स्वरूपाचे कारवाई न करता दोन्ही घटनेतील आरोपीला त्वरित फाशी देण्यात यावी याबाबत शासनाने आणखीन कडक कायदे करून अशा घटना होणार नाही याबाबत शासन दरबारी विचार करून अशा घटनेतील आरोपींना फाशीच ही शिक्षा अशी अंमलबजावणी करावी व सदर घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी द्यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नयेत यावर उपाय म्हणजे शासनाने आशा घटनेला पर्याय म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी मुस्लिम राष्ट्रात ज्याप्रमाणे एखाद्या आरोपीने एखाद्या मुलीवर जर का बलात्कार केला तर त्या आरोपीला भर चौकात फाशी देतात अशीच अंमलबजावणी आपल्या भारत सरकारने अंमलात आणावी असे प्रसिद्धी पत्रकात श्री जाधव यांनी शेवटी म्हटले आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group