Saturday, October 3, 2026
Latest:
Uncategorized

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 

करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील वैभव सुरवसे याने 17 वर्ष वयोगट व 71 किलो वजन गटात जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे . त्याची विभागीय कुस्तीसाठी निवड झाली त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील जाधव श्री अंकुश खाने, श्री भागवत सर व श्री जगदाळे सर यांच्या हस्ते वैभव सुरवसे याचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वैभवला मार्गदर्शन करणारे श्री जितेश कांबळे व श्री शुभम पाटील यांचा सत्कार श्री शरद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाने क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हास्तरामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यावेळी वैभव सुरवसे यास विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!