नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नवलेखक-नवकवींसाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा रेल्वे लाईन, डफरीन चौक येथील सारस्वत ब्राह्मण सोशल क्लब येथे होणार आहे, अशी माहिती कार्यशाळा प्रमुख गझलकार सुहास घुमरे व सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी यांनी दिली.
कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी राहणार आहेत. यावेळी समरसता साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. भूमिका डॉ. गजानन होडे हे मांडणार आहेत. या कार्यशाळेत कवितेतील छंद-वृत्तांचे महत्त्व डॉ. राजेंद्र नाईकवाडे, कवितेची शब्दकळा डॉ. विजय राठोड, काव्यातील प्रतिमासृष्टी डॉ. रमा गर्गे, भावना-विचारांची अभिव्यक्ती यावर कवयित्री मृणाल देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. गटचर्चेत काशीनाथ पवार, मानसी चिटणीस, डॉ. वैशाली मोहिते, डॉ. नरेंद्र गुंडेली, दत्तात्रय इंगळे, सुहास घुमरे, विजय मोरे, विनायक कुलकर्णी, हेमा पाटील, आनंद हरी, सुधाकर ईनामदार हे नवकवींना कविता लेखनाचा महामंत्र देणार आहेत. दुपारी ४.३० वा. होणाऱ्या समारोप सत्रात समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, सुनील ढेंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी डॉ. दुर्गा जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, जनता बँकेच्या संचालिका गौरी आमडेकर, प्रा. संतोष जाधव,आनंद धडके, ऐश्वर्या धडके, श्र्ाद्धा रोडगे, मदन जवळेकर, अमृता कल्याणी, रुपा कुताटे, विजयकुमार सोनवणे हे परिश्रम घेत आहेत.


