रोपळे येथे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण

करमाळा प्रतिनिधी. रोपळे ता.माढा येथे ७४व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आ.रणजितसिंह मोहिते पाटील व जि.प .अध्यक्ष अनिरुध कांबळे यांचे शुभहस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी भारत नाना पाटील,युवक नेते अजित तळेकर, सरपंच तात्या गोडगे,करमाळा भाजपाचे शहर अध्यक्ष जगदिश आगरवाल,युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिपक चव्हाण,सर्वादय प्रतिष्ठानचे अमरजित साळुंखे,उपसरपंच तानाजी दास,ग्रामविकास अधिकारी तानाजी मोहिते,पोलिस पाटील नगनाथ गवळी,तंटामुक्ती अध्यक्ष शरद पाटील,आनंद गोडगे,धनाजी पाटील,पोपट पाटील,हर्षल वाघमारे,गोविंद पाटील,अदिंसह उपस्थित रोपळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
