Thursday, September 17, 2026
Latest:
Uncategorizedकरमाळा

करमाळयात महिला पैठणीचा कार्यक्रम 14जानेवारीला पुन्हा मोठया दिमाखात संप्पन होणार -अभयसिंह जगताप

करमाळा प्रतिनिधी करमाळयात महिला पैठणीचा कार्यक्रम मोठया रविवारी 14 जानेवारी रोजी पुन्हा एकदा  दिमाखात होणार असल्याचे राष्ट्रवादी काॅंग़्रेस काॅंग्रेस शिवसेना महायुतीचे अभयसिंह जगताप यांनी सांगितले आहे . करमाळ्यात राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अभयसिंग जगताप यांनी भव्य असा महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा- होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम काल 13जानेवारीला आयोजित केला होता त्याला हजारो महिलांनी उपस्थितीत लावली. मात्र कार्यक्रम रंगात येताच वेळेच्या बंधनामुळे पोलिस प्रशासनाने कायक्रम बंद करण्याची सूचना केली. महिलांचा प्रतिसाद असतानाही आणि पोलिस प्रशासनाच्या सूचनेचा आदर करत जगताप यांन या स्थितीत म्हणजे रात्री १० वाजता कार्यक्रम बंद केला आणि काही वेळातच रविवारी म्हणजेच आज पुन्हा हा कार्यक्रम होईल याची घोषणा त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे संतोष वारे नलिनी जाधव उपस्थित होते.

माढा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून माणचे अभयसिंग जगताप यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. संतोष वारे यांच्यासह प्रा. गोवर्धन चवरे, राजश्री कांबळे आदीजण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
 मोठ्या उत्साहात कार्यक्रम सुरु असताना हा कार्यक्रम वेळेच्या बंधनामुळे (रात्री १० वाजल्याने) निम्यातून बंद करावा लागला. . त्यामुळे असाच कार्यक्रम आज घेण्याचे जाहीर केले आहे.देशाचे नेते शरद पवार यांचे आम्ही कार्यकर्त कायदा व सुव्यवस्था पाळणारे असल्याने कालचा कार्यक्रम आम्ही वेळेच्या बंधनामुळे सहकार्याची भूमिका घेऊन बंद केला होता.हा कार्यक्रम आज होणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे’, असे अभय जगताप यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!