पक्षाच्या उत्कृष्ट कामाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला चक्क गणेश चिवटे यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी:- भारतीय जनता पक्षाचे करमाळा माढा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांनी केलेल्या पक्षाच्या उत्कृष्ट संघटनात्मक कामाबद्दल चक्क भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल त्यांचा सत्कार टेंभूर्णी येथे भेटीदरम्यान केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काल रात्री उशिरा टेंभुर्णी येथे आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत,करमाळा माढा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,रामभाऊ ढाणे आदींनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माढा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा झाली.गणेश चिवटे यांनी करमाळा माढा विधानसभा मतदार संघात केलेले संघटनात्मक काम,पक्षाने दिलेला प्रत्येक उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या राबवला आहे यावर प्रभावित होऊन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे त्यांनी चक्क त्यांचा सत्कार केला.गणेश चिवटे यांनी आजवर भाजपच्या सर्व नेते कार्यकते यांना बरोबर घेऊन पक्षाचे काम केले आहे.माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत केले आहे. पक्षाचे काम गाव खेड्यात नेले आहे.या कामाची पावती म्हणून पक्षाने त्यांना जिल्हा नियोजन समिती व केंद्र सरकारच्या दिशा कमिटीवर काम करण्याची संधी दिली आहे.करमाळा तालुक्याचे राजकारण आजवर गटा तटाचे होते याला छेद देत पक्षीय राजकारण गणेश चिवटे यांनी मोठ्या ताकतीने रुजवले आहे.त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक महत्वपूर्ण लोकप्रतिनिधीचे भाजपा मध्ये प्रवेश होत आहेत या त्यांच्या सर्व कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला सत्कार महत्वपूर्ण मानला जात आहे.गणेश चिवटे यांना भविष्यात पक्ष संघटना कोणती ताकत किंवा जबाबदारी देणार यावर करमाळा माढा विधानसभा मतदार संघातील लोकांचे लक्ष आहे.
