करमाळा येथील प्राध्यापिका सौ.अश्विनी भोसले ओहोळ यांना कॅन्सर वरील विशेष संशोधन केल्याबद्दल भारत सरकारकडून पेंटेट बहाल
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुणे हडपसर येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी पुणे हडपसर येथे कार्यरत असलेल्या प्राध्यापिका सौ. अश्विनी भोसले ओहोळ यांनी केलेल्या विशेष संशोधन कार्याबद्दल भारत सरकारकडून त्यांना पेंटट बहाल करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात आताच परिश्रम करून विषय संशोधन करून एक इन्स्ट्रुमेंट तयार केले आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे का हे निदान केले जाते. कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत मात्र कॅन्सरचे योग्य वेळी निदान झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो ही काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी समाज उपयोगी असे मशीन तयार केले आहे. त्यांचा कामगिरीची दखल भारत सरकारने घेऊन त्यांना स्मार्ट लंग कॅन्सर डिव्हाइससाठी पेंटेड बहाल केले आहे. याचबरोबर दुसऱ्या एका संशोधन कार्याबद्दल लंडन येथील पेंटेड मिळाले आहे. पोर्टेबल डिवाइस ईन कॅन्सर डिटेक्शन साठी त्यांना इंटरटेन प्रॉपर्टी ऑफिस युनायटेड किंगडम लंडन कडून पेंटेड मिळाले आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
