उजनी काठावरचा शेतकरी हवालदिल दहा डिसेंबर नंतर आणखी नदीतून पाणी सोडणार या बातमीने धास्तावला 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता देणार जलसंपदा मंत्र्याला करमाळा तहसीलदारमार्फत निवेदन
करमाळा प्रतिनिधी -उजनी धरण यंदा केवळ 66 टक्केच भरले. अत्यल्प झालेल्या पावसामुळे हे संकट ओढवले आहे. त्यातच कालवा सल्लागार समिती ,उजनी धरण व्यवस्थापण यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मागील एक ते दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशोबी पाण्यामुळे उजनी धरण 66 टक्क्यावरून बघता बघता आजच्या तारखेला डिसेंबर मधेच 25 टक्क्यावर आले आहे. उजनी चा कालवा,भिमा सिना जोडकालवा, सिना माढा व दहिगाव उपसासिंचन योजना यातून दररोज 5000 क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी कमी होत आहे.
त्यातच कालपासून सोशल मिडीयातून दि .10 डिसेंबर पासून नदी द्वारे पाणी सोडणार* असल्याची बातमी येवून थडकली आहे . यामुळे लवकरच मायनस मधे धरण जावून उजनी काठावरील धरणग्रस्त, तसेच अन्य शेतकरी हबकून गेले आहेत.
डिसेंबर संपण्यापूर्वीच अशी अवस्था असेल तर “फेब्रुवारी ते जून अखेर सहा महिने आपलं कसं होणार ?” या चिंतेने उजनी काठचा शेतकरी धास्तावला आहे .तात्काळ सर्व लोकप्रतिनिधींकडून यावर हालचाल होणे आवश्यक असल्याची भावना लोकांची भावना असून कुणीच याबाबतीत पुढाकार घेत नसल्याने संताप ही आहे. “कालवा सल्लागार समिती उजनी च्या खालील लोकप्रतिनिधीं च्या हात चं बाहुलं बनली की काय ? “अशी शंका लोक आता उघड उघड घेऊ लागलेत.
त्या तुलनेत उजनी च्या वरील भागाचे नेतृत्व करणारी आजी माजी आमदार व पदाधिकारी मूग गिळून गप्प आहेत. अशा वेळेस उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती मात्र कायम आवाज उठवत असते. संघर्ष करीत असते. ज्या ज्या वेळेस उजनीची पाणी पातळी खालावते, वीज कपातीच संकट येतं त्या त्या वेळेस संघर्ष समिती सरसावलेली असते. यापूर्वी अनेकदा वीज कपातीच संकट शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून उजनी काठावरील शेतकर्याला न्याय मिळवून देण्याचं महत्वपूर्ण काम संघर्ष समितीने केले आहे.
काल सोलापूर जिल्हाधिकारी याना निवेदन देवून तात्काळ कालवा सल्लागार समिती व उजनी धरण व्यवस्थापन यांनी धरणग्रस्तांवर अन्याय होऊ नये व काटेकोर पाणी नियोजन करावे अशी मागणी केली आहे. हा विषय एवढ्यावर थांबवून चालणार नाही. पुढच संकट गहिरं आहे . म्हणून शासनाला यात लक्ष घालून उजनी धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागता कामा नये. त्यांच्यावर वीज कपातीचं संकट येता कामा नये या साठी शासनाला ही अवगत करण्यासाठी शुक्रवार दि 8 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले जाणार आहे.
हे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत शासनाला देण्यासाठी* उजनी धरणग्रस्त कार्यकर्ते,जलाशय काठावरील सर्व पदाधिकारी ,दहिगाव उपसासिंचन योजनेचा लाभ होत असलेल्या गावातील कार्यकर्ते,पदाधिकारी ,आदिनाथ, मकाई चे आजी माजी संचालक, पदाधिकारी,पं स तसेच जिप चे आजी माजी सदस्य, पदाधिकारी,मार्केट कमिटीचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, सोसायट्यांचे आजी माजी अध्यक्ष, आजी माजी संचालक आदि सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा तालुका यांचे वतीने करण्यात आले आहे.
