करमाळा येथील रहिवासी अशोक अण्णा दहिदुले यांचे दुखःद निधन
करमाळा येथील मुथ्थानगर रहिवासी अशोक दहिदुले वय 68 यांचे आकस्मिक दुखःद निधन झाले आहे. स्वर्गीय डॉक्टर एसटी शहा यांचे विश्वासू सहाय्यक कर्मचारी म्हणून ते सर्व करमाळावासियांना परिचित होते. आपल्या मनमिळावू प्रेमळ स्वभावामुळे सगळे त्यांना अण्णा म्हणत होते . विनम्र व तात्काळ सेवेसाठी ते सदैव कार्यरत होते. त्यांच्या मृत्युपश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. हिंदू स्मशानभूमी विकास नगर करमाळा येथे त्यांच्यावर सहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
